मुंबई : अजितदादा पवार यांच्यासोबत आमची विलनीकरणाबद्दल चर्चा झालीच होती हे आम्ही अधीच सांगितले होते. जे काही त्या चर्चेत ठरले होते ते ठरले होते. आता काही लोकांनी सत्य सांगितले आहे. आता त्यावर काही लोकांनी उशिरा का होईना सत्य मान्य केले,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की,राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत पूर्वी चर्चा झाली होती, हे आता मान्य करण्यात आलं आहे. सत्य उशिरा का होईना समोर आलंच,आम्ही पक्ष बळकटीसाठी, नवीन कार्यकर्त्यांना संधी देणार आहोत, आदरणीय शरद पवारसाहेब स्वतः महाराष्ट्रभर दौरे करणार आहेत.पण भाजपची रणनीती इतर पक्ष फोडून स्वतःचा पक्ष मजबूत करण्याची आहे,असे शशिकांत शिंदे यांनी बोलताना सांगितले.

शशिकांत शिंदे म्हणाले की, इतर पक्षांच्या अंतर्गत निर्णयांवर भाष्य करणं योग्य नाही,त्यांनीच त्याबाबत खुलासा करावा.परंतु निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रातील काही पदांबाबत स्पष्टता नसल्यानं शंका निर्माण होत आहेत,असे शशिकांत शिंदे म्हणाले.

शशिकांत शिंदे म्हणाले की,लाडकी बहीण योजनेचे श्रेय अनेकांनी घेतले. निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून निकष, नियम न बघता राज्याच्या तिजोरीतून पैसे वाटण्यात आले,आर्थिक बोजा पडू लागला म्हणून नियम, निकष लावण्यात आले आणि आता 71 लाख बहीणींना त्यापासून वंचित केले जात आहे. आम्ही तेव्हाही सांगत होतो हे सरकार केवळ मतांसाठी राजकारण करते,असेही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू आहे. त्यामध्ये बरेच काही माहिती समोर येत आहे. आपण पोलिस आणि एसआयटी चौकशीला वेळ दिला पाहिजे. खरातची पत्नी दोन दिवसांपासून फरार आहे त्या का भेटत नाही याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे, असे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

यावर सविस्तर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, शक्तीपीठ महामार्गासाठी सुपीक जमिनी घेताना शेतकऱ्यांची संमती आवश्यक आहे,अन्यथा विरोध होईल,गॅस टंचाई आणि संभाव्य काळाबाजार टाळण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करावी, असेही शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.