दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा, डौली या शाळेची इमारत पुन्हा एकदा डौलाने उभी राहिली आहे. आणि येत्या 15 जून रोजी पहिली ते सातवीचे विद्यार्थी पुन्हा या शाळेत धडे गिरवायला सुरुवात करणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून पडीक असलेल्या या शाळेमध्ये जिथे उन, वारा, पाऊस झेलत विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागत होता, जिथे बाकावर बसणे देखील शक्य नव्हते ती शाळा आता डौलाने उभी राहिली आहे. ५५ वर्षांच्या या शाळेला नवसंजीवनी मिळाली आहे. या शाळेच्या पडीक झालेल्या खोल्या पुन्हा उभारण्यात आल्या आहेत आणि हे साध्य केले आहे ते याच शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांनी.
माजी विद्यार्थ्यांनी एकजुटीने एक- दिलाने येऊन केलेले हे काम खरंच वाखाणण्याजोगे आहे.
डौली जिल्हा परिषद मराठी शाळा पडीक झाली असताना शाळेत मुलांना शिकवणार कसे असा प्रश्न जेव्हा शिक्षकांना पडला तेव्हा शिक्षकांनी न राहवता ही व्यथा व्हाट्सअप ग्रुप वर सांगितली. या ग्रुपवर असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेची परिस्थिती पाहून वाईट वाटले.
या गोष्टीची त्यांनी दखल घेत सर्वांशी चर्चा करत अखेर शाळेच्या पडीक झालेल्या खोल्या बांधण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे माजी विद्यार्थ्यांपैकी काहींची मुलेसुद्धा या शाळेत शिक्षण घेत आहेत.
बांधकाम करायचं म्हणजे
आर्थिक खर्च हा होताच.
अखेर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत सर्वांच्या सहकार्याने व पालकांच्या पुढाकाराने माजी विद्यार्थ्यांनी श्रमदानातून या शाळेच्या भिंतीं तसेच छप्पर बांधले. माजी विद्यार्थी हे या शाळेसाठी स्वतः मजूर बनले आणि आपल्या शाळेच्या पडीक खोल्या श्रमदानाने बांधल्या.
एकेकाळी ज्या शाळेने त्यांच्या शिक्षणाचा पाया रचला होता त्याच विद्यार्थ्यांनी पुढे आपल्या शाळेला न विसरता आपल्या पडीक झालेल्या शाळेतील वर्गांचा (खोल्यांचा)पाया रचला. शाळेच्या पडीक भिंतींच्या जागी आता नव्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. शाळेचे बांधकाम बऱ्यापैकी नव्याने करण्यात आले आहे. मात्र अजून रंगरंगोटी बाकी आहे.
आपली शाळा कोसळू न देता तिला नवसंजीवनी देणा-या माजी विद्यार्थ्यांच्या या कार्यकर्तृत्वाला सलाम…
या शाळेत विद्यार्थी आता पुन्हा धडे गिरवायला सुरुवात करतीलच पण त्याचबरोबर ते संस्काराचा आणखी एक धडा देखील गिरवणार आहेत ते म्हणजे आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानाचा.
विशेष म्हणजे आज जे माजी
शाळेला उभारणी मिळावी म्हणून
सरपंच हरिश्चंद्र महाडीक
उपसरपंच अनंत महाडीक
तंटामुक्ती अध्यक्ष अनंत बाबू महाडिक, यांचं देखील योगदान यासाठी आहे तसंच
अंगणवाडी सेविका आर्वी महाडिक आणि शीतल गायकवाड या
सर्वांचं मोलाचं योगदान आहे.
तसंच शाळा व्यवस्थापन समिती जि.प.मराठी शाळा डौली चे अध्यक्ष संतोष गणपत जाधव, उपाध्यक्ष रुपेश मारुती महाडिक, सदस्य अक्षय महाडिक, पांडुरंग महाडिक, प्रवीण महाडिक, अमोल महाडिक, राजेंद्र महाडिक, सुचिता जाधव, शिक्षक विजय जाधव, मधुरा सोमण यांचं मोलाचं सहकार्य लाभलं.