मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा बैठक पार पडली आहे. पक्षाचे बांधणी करिता संघटनेत बदल करण्यात येणार आहे. १ महिन्यात पुन्हा पक्ष राज्यात जोमाने उभा राहिलेला आपल्याला दिसेल. २०२९ चे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काम करत आहोत.असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले की, विलीनीकरण विषय आम्ही मागेच संपवला आहे. अजितदादा पवारांना खर्या अर्थाने श्रद्धांजली पक्ष विलिनीकरण दिली गेली असती. आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांना वाटत नसेल तर त्याला काही करू शकत नाही. विलीनीकरण ही भावना त्यांच्या मनात असते तर कधीच विलीनीकरण झालं असतं. असेही शशिकांत शिंदे म्हणाले.