रत्नागिरी: विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्यातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान २०२६’ या वर्षी चिपळूण येथे संपन्न होणार आहे. भारतीय मूल्ये, सत्यनिष्ठा आणि राष्ट्रहितासाठी समर्पित पत्रकारितेला प्रोत्साहन देणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, कोकण विभागातील पाच पत्रकारांना यंदा सन्मानित करण्यात येणार आहे.
पत्रकारिता हा केवळ माहिती पोहोचवण्याचे साधन नसून तो राष्ट्रनिर्माणाचा एक बळकट आधारस्तंभ आहे, असा विश्व संवाद केंद्राचा विश्वास आहे. याच भावनेतून निर्भीड आणि तथ्यांवर आधारित पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना हे व्यासपीठ दरवर्षी गौरविते, असे डॉ. भांडारकर यांनी सांगितले.
या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, तसेच या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी आपले वार्ताहर व छायाचित्रकार पाठवावेत, अशी नम्र विनंती विश्व संवाद केंद्र आणि सहयोगी संस्था नवनोकण एज्युकेशन सोसायटी, चिपळूण यांच्यातर्फे करण्यात येत आहे.