चिपळूण : चिपळूण नागरी पतसंस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली “चिपळूण नागरी प्रीमियम लीग 2026″ आज अंतिम टप्प्यात पोहोचली असून, पवन तलाव मैदानावर आज रंगणार आहे थरारक फायनल सामना. विद्युत रोषणाईत झगमगणाऱ्या या स्पर्धेने संपूर्ण चिपळूणकरांना अक्षरशः क्रिकेटच्या उत्साहात रंगवून टाकले आहे.
या स्पर्धेतील प्रत्येक सामना अत्यंत रोमांचक पद्धतीने खेळला गेला असून, मैदानावरील व्यवस्थापनही तितक्याच चोख पद्धतीने पार पडताना दिसत आहे. खेळाडूंमध्ये दिसणारी शिस्त, त्यांची खेळाडू वृत्ती आणि उत्कृष्ट कौशल्य पाहून पतसंस्थेचा दर्जेदार कारभार स्पष्ट जाणवतो.
ही लीग केवळ सामने नाही, तर स्थानिक खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ ठरली आहे. अनेक युवा खेळाडूंनी आपल्या खेळातून प्रेक्षकांची मने जिंकली असून, त्यांच्या अंगभूत गुणांना योग्य वाव मिळाल्याचे चित्र दिसून आले.
मैदानावरील भव्य रोषणाई, आकर्षक स्टेज, दमदार साऊंड सिस्टीम आणि खचाखच भरलेले प्रेक्षक—या सर्वांमुळे ही स्पर्धा जणू आयपीएलच्या धर्तीवर रंगत असल्याचा अनुभव प्रेक्षकांना मिळत आहे. प्रत्येक क्षणी टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष यामुळे वातावरण भारलेले आहे.
या संपूर्ण स्पर्धेला संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली असून, त्यांच्यासह चव्हाण परिवारही व संचालक मंडळ पूर्ण उत्साहाने या स्पर्धेत सहभागी झालेला दिसतो.
तसेच, पतसंस्थेच्या सीईओ सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संपूर्ण स्पर्धेचे नियोजन शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडले आहे.
आजच्या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, मोठ्या जल्लोषात हा थरार अनुभवण्यासाठी चिपळूणकर सज्ज झाले आहेत.
चिपळूण नागरी प्रीमियम लीग क्रिकेटचा जल्लोष शिगेला! अंतिम सामन्याची रंगत शिगेला पोहोचली
