खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील व तालुक्यातील कळबणी बुद्रुक गावातील हॅपी सिंगच्या धाब्यावर भरघाव वेगात कळबणी बुद्रुक येथुन खेडच्या दिशेने दुचाकीस्वार गणेश वजरा वय 26 रा. कळबणी बुद्रुक ता खेड जि रत्नागिरी याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एमएच 08 Z 1367 वरील दुचाकीस्वार जखमी गणेश वजरा हा आपल्या ताब्यातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गणेश वजरा, वय 26 रा कळबणी बुद्रुक ता खेड जि रत्नागिरी यास गंभीर दुखापत झाली असून, अपघाताची खबर मिळताच भरणा नाका येथील पुलाखाली उभी असलेली नरेंद्राचार्य नाणीजधाम 24 तास रुग्णवाहीकेचा चालक सुरेश हंबीर हा अपघातस्थळी रुग्णवाहीका घेऊन अपघातस्थळी दाखल होत अपघातग्रस्त दुचाकीस्वार गणेश वजरा यास घेऊन कळबणी बुद्रुक येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी दुचाकीस्वार गणेश वजरा याचेवर वैद्यकीय उपचार सुरु ठेवत, औषधोपचार चालु ठेवले. तर हा अपघात बुधवार दि. 23 सष्टेबर 2026 रोजी रात्री 9.50 वाजताच्या सुमारास घडला. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
