मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर केलेले आरोप हे तथ्यहीन आणि राजकीय हतबलतेतून आलेले आहेत. मुद्द्यांवर बोलता येत नसल्यामुळे काँग्रेस नेते समाजात जातीयतेचं विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलण्याऐवजी खोट्या आरोपांची मालिका लावणं ही काँग्रेसची जुनी सवय आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण करण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही. महाराष्ट्रात उद्योग, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. पण काँग्रेसकडे मुद्दे संपले की ते जातीयतेचा कार्ड काढतात हा त्यांचा जुना राजकीय फॉर्म्युला आहे.

देवाभाऊ विकासाचा महामार्ग बांधत आहेत, आणि काँग्रेस अजूनही आरोपांच्या खड्ड्यात अडकली आहे. ज्यांनी 60 वर्षे सत्ता उपभोगूनही शेतकऱ्यांचे आयुष्य बदलले नाही, ते आज शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणत आहेत. काँग्रेसला विकास दिसत नाही, कारण त्यांच्या राजकारणाचा चष्माच नकारात्मकतेचा आहे आणि यामुळेच जनतेनं देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसला नाकारले आहे.