मुंबई – पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमृल कॉग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे. जनतेने सत्ता परिवर्तन घडवुन भाजपला स्पष्ट बहुमत दिलेले आहे. त्यामुळे जनादेश स्विकारुन ममता बॅनर्जी यांनी मोठया मनाने पराभव मान्य केला पाहिजे.
राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जी यांची भूमिका लोकशाहीचा मुडदा पाडणारी आहे. ममता बॅनर्जी यांची भुमिका संविधान आणि लोकशाहीला घातक आहे अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केली आहे.
पश्चिम बंगालचे भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी यांचे पी.ए. चंद्रकांत रथ यांच्या झालेल्या हत्येचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण तिव्र निषेध करतो. मारेक-यांना त्वरीत अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. पश्चिम बंगालमधील गुंडशाही संपवण्यासाठी केंद्र सरकारने येथे सैन्यदलाला उतरविले पाहिजे. असे ना. रामदास आठवले म्हणाले.