खेड : येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप विद्या संकुल भडगाव येथे सोमवार दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2:00 वा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचेतर्फे पोस्को अंतर्गत लैगिंक गुन्ह्यापासून बालकांच्या संरक्षणाबाबत जनजागृती व ड्रग्ज सेवन या सर्वांपासून विद्यार्थ्यांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे हे या कार्यक्रमात सांगण्यात आले, सदर कार्यक्रमास श्री. राजेंद्र पाटील, सचिव , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी श्री. गणेश पाटील, दिवाणी न्यायाधीश , दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर , खेड, श्रीमती वंदना कनोजे, पोलीस उपनिरीक्षक, खेड, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेडचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी हे उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्या हस्ते करण्यात आला, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे, विभाग प्रमुख विठ्ठल सकुंडे, मारुती आडाव, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इ. 11 वो 12 वी विज्ञान व वाणिज्यचे 350 विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मगदूम यांनी केले. लैगिंक गुन्ह्यापासून बालकांच्या संरक्षणाबाबत अनेक कायदे व तरतुदी यांची अत्यंत उपयुक्त अशी माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना श्री. राजेंद्र पाटील, श्री. गणेश पाटील व श्रीमती वंदना कनोजे यांनी दिली.
सदर कार्यक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी केले.