लांजा : कै. काकासाहेब सरफरे स्मृती व्याख्यानमाला व लांजा तालुका माध्य. व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ०४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) मार्गदर्शन कार्यशाळा व आदर्श प्रश्नसंच वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
लांजा तालुका शिष्यवृत्ती परीक्षा व गुणवत्तेत अव्वल ठरावा म्हणून गेली अनेक वर्षे काकासाहेब सरफरे स्मृती व्याख्यानमालेच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबवित असतात त्याचा ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फायदा होत आलेला आहे. चालू शैक्षणिक वर्षी तालुक्यातून किमान 100+ विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत यावेत यासाठी तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून यासाठी उद्योजक सुबोध सरफरे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे
ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शन मिळावे व तालुक्याची गुणवत्ता वाढावी यासाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेसाठी गणित विषयासाठी विलास पाटील सर , बुद्धीमत्ता विषयासाठी रवि मोळे सर ,समाजशास्त्र विषयासाठी प्रकाश गोते सर तर विज्ञान विषयासाठी कृष्णा पाटील सर हे कोल्हापूर येथील अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत तसेच याचवेळी आदर्श प्रश्नसंच याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे तरी NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी व तालुक्यातील मार्गदर्शक शिक्षक यांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक दत्ताजी कदम व सुबोध सरफरे यांनी केले आहे.
लांजामध्ये रविवारी संपन्न होणार शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा…
