खेड : खेड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील विविध प्रभागांतील मुलींसाठी मोफत MS-CIT संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरातील सुमारे ४० मुलींना या उपक्रमाचा मोफत लाभ मिळणार असून, संगणक प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हा संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रम खेड शहरातील विद्यार्थीप्रिय Ask Me Computer Education Centre येथे विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संगणकाचे मूलभूत ज्ञान, डिजिटल कौशल्ये आणि दैनंदिन जीवन तसेच शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर याबाबत प्रशिक्षण या माध्यमातून मिळणार आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या लाभार्थी विद्यार्थिनींना खेड नगरपरिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष श्री. सतीश चिकणे, गटनेते श्री. निकेतन पाटणे, गटनेते श्री. रहीम सहीबोले, सभापती सौ. रसिका खेडेकर, सभापती श्री. भूषण चिखले, नगरसेवक श्री. मिनार चिखले, श्री. स्वप्नील सैतावडेकर, नगरसेवक श्री. प्रेमळ चिखले, श्री. आरिफ मुल्लजी, नगरसेविका सौ. वर्षा सापते, नगरसेविका सौ. रेश्मा खतीब, नगरसेविका सौ. दीप्ती शिगवण, शहर संघटिका सौ. नेहा दळी, उपशहरप्रमुख श्री. अंकुश विचारे, सौ. दरेकर तसेच Ask Me Computer Education Centreचे श्री. विनय शिरगांवकर उपस्थित होते.
महिला व बालकल्याण समितीच्या या उपक्रमामुळे शहरातील मुलींना मोफत संगणक प्रशिक्षणाची संधी मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक तसेच भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी आवश्यक डिजिटल कौशल्ये विकसित करण्यास मदत होणार आहे. विद्यार्थिनींनी या संधीचा योग्य उपयोग करून संगणक क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
खेड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचा उपक्रम; शहरातील ४० मुलींना मोफत MS-CIT संगणक प्रशिक्षण..
