चिपळूण : परशुराम रुग्णालय, लोटे व Amanora Yess Foundation, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, ३० सप्टेंबर रोजी पेढे येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा एकूण ६५ रुग्णांनी लाभ घेतला.
विशेष म्हणजे, या शिबिरात २६ महिलांची ‘आय-ब्रेस्ट’ (iBreast) तपासणी करण्यात आली. स्तन कर्करोगाच्या लवकर निदानासाठी ही तपासणी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिबिरात रुग्णांची सामान्य आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणीसह इतर आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. गरजेनुसार रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
परशुराम रुग्णालय, लोटे व Amanora Yess Foundation, पुणे यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे पेढे आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा घरच्या दारात मिळाली. अशी शिबिरे भविष्यातही नियमितपणे आयोजित करण्याचे नियोजन संस्थांच्या प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
