चिपळूण (विशेष प्रतिनिधी): चिपळूण नगरपरिषदेची विशेष सभा आज सोमवारी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावरून काही काळ हंगामा झाला.

१५० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी ग्रॅव्हिटी पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर आढावा या सभेत घेण्यात आला. या योजनेच्या कामाच्या सद्यस्थितीबद्दल प्रशासनाने माहिती दिली.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सर्व सदस्यांना बोलण्याची संधी देत सभा चांगल्या पद्धतीने हाताळली.

या विशेष सभेत उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, गटनेते शशिकांत मोदी, निहार कोवळे, विकी नरळकर, फैसल कासकर, प्रमोद बुरटे, विकी लवेकर, साजिद सरगुरोह, रसिका देवळेकर, अंजली कदम, नसरीन खडस आदी नगरसेवकांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.

याशिवाय फटाके विक्रेत्यांसाठी आता एकाच छताखाली स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला.