खेड : शहरातील महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी महिला बालकल्याण समितीच्या वतीने गुरुवार दि. 08 ऑक्टोबर 2026 रोजी खेड नगरपरिषदेच्या सभागृहात विविध प्रकारचे प्रशिक्षण राबवण्यात आले.
या मॅट रांगोळीचे प्रशिक्षण बचत गटातील महिलांसह सर्व तळागाळातील 100 महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत प्रशिक्षण दोन बॅचमध्ये राबवण्यात आले. यासाठी महिला बालकल्याण समिती सभापती रसिका राकेश खेडेकर, उपसभापती वर्षा तुषार सापटे, सदस्या दीप्ती ताई शिगवण, स्वप्नाली चव्हाण, तसेच मिनार चिखले यांनी सक्रिय सहभाग घेतला.
मॅट रांगोळी प्रशिक्षण शिबीराला नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला उपनगराध्यक्ष पप्पूशेठ चिकणे, मुख्याधिकारी श्री. रोडगे साहेब व शिवसेना गट नेते श्री निकेतन पाटणे, नगरसेवक प्रेमळ चिखले, श्री. स्वप्निल सेतवडेकर, नगरसेविका नीता आंब्रे व नगरसेविका सौ. कुरणे यांच्यासह सर्व विषय समिती सभापती नगरसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
फोटो
खेड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने नपा सभागृहात आयोजित मॅट रांगोळी प्रशिक्षण शिबिरातील सहभागी शिबिरार्थी महिलांचे छायाचित्र