चिपळूण (विशेष प्रतिनिधी): शहरा जवळच्या खेर्डी एमआयडीसीमधील एका फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्याला आज रात्री दहाच्या सुमारास आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली.
ही आग क्षणार्धात भडकली आणि संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडला. चिपळूण नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले आहेत.
खेर्डी एमआयडीसीमध्ये फायर स्टेशन उभारण्यात आले आहे मात्र अग्निशमन बंबाची मागणी होऊनही ती आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. याकडे अनेकांनी लक्ष वेधले आहे.
ठाकरे सेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब कदम तसेच पालिकेचे बांधकाम सभापती कपिल शिर्के यांच्यासह अनेकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली .
राष्ट्रवादीचे नेते नितीन ठसाळे हेही मुंबई येथून जमेल त्या पद्धतीने मदतकार्यात योगदान देत आहेत. रात्री उशिरा घटनास्थळी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.
