रायगड : रायगड रोपवेची हंगामपूर्व देखभाल, दुरुस्ती आणि तांत्रिक तपासणीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर रायगड रोपवेची सेवा २१ सप्टेंबर २०२६ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.
रोपवेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच आवश्यक सुरक्षा तपासण्या या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ पासून रोपवेची सेवा पुन्हा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, कामे पूर्ण झाल्यानंतर आणि रोपवेची सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत अधिकृत माहिती देण्यात येईल, असे रायगड रोपवे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
रोपवे सेवा तात्पुरती बंद राहणार असल्याने प्रवाशांना आणि पर्यटकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रायगड रोपवे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
— राजेंद्र खातू,
रायगड रोपवे प्रशासन