चिपळूण : तालुक्यातील कापरे येथील मोरे निमई गावातील श्री देव नागार्जुन मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सव २०२६ निमित्त महाआरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ७ ते ७.३० या वेळेत होणार आहे.

या महाआरतीसाठी ग्रामदेवतेचे मानकरी, पदाधिकारी, ग्रामस्थ, भक्तगण, महिला व बालकांसह सर्व भाविकांनी वेळेत मंदिरात उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. दररोज बरोबर सायंकाळी ७ वाजता आरतीला सुरुवात होणार असून, त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाआरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.