लांजा : घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत लांजा येथे श्री दुर्गामाता दौडीचा जयघोष दि.११ला बसवेश्वर चौक,भाईशेट्येवाडी, जुगाईदेवी,पौलतेश्वरमंदीर, शेट्ये वाडी, भगवती मंदिर,केदारलींग मंदीर,चव्हाटामंदीर दि.१२हरभट मंदिर, कुंभारवाडी,डपलेवाडी, रोहीदासवाडी, विठ्ठल मंदिर,दि.१३ उपशेट्येवाडी,मधली कुंभारवाडी,उंबरदेवी, गणपती मंदिर,खालची कुंभार वाडी,गोरा कुंभार मंदिर,दि.१४ जगनाडा महाराज,तेलीवाडी,जांगलदेव, स्वामी स्वरूपानंद मंदिर,वैभव वसाहत,दि.१५ सिद्धीविनायक, राजमाता जिजाऊ चौक,कनावजेवाडी,दि.१६ शिवाजी चैक ,साटवलीमार्ग, विठ्ठल मंदिर,आगरवाडी, दत्तमंदिर,दि.१७ सतीमाता,धावनेवाडी, महापुरुष मंदिर,गुरववाडी,खावडकरवाडी,दि.१८ संदीप स्मृती नवरात्रमित्र मंडल, माऊली नगर,भटवाडी,दि.१९ जाकादेवी मंदिर, बौद्ध वाडी,शेट्येवाडी, विठ्ठला देवी,कलावती मंदिर,दि.२० पोलीस स्टेशन, महापुरुष,चव्हाटा पोस्टगल्ली,राम मंदिर, हनुमान मंदिर या मार्गाने दुर्गामाता दौड मिरवणूक काढण्यात येते.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, लांजा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेली ही दौड मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी अश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमीपर्यंत सुरू राहणार आहे.
या कालावधीत दररोज सकाळी पावणे सहा ते सव्वा सात या वेळेत श्री दुर्गामाता दौड काढण्यात येते. दररोज तीन ते चार वाड्यांमध्ये तसेच प्रत्येक वाडीतील तीन ते चार मंदिरांमध्ये धार्मिक पूजा-अर्चा करण्यात येते.क्ष त्यानंतर देवीचा जयघोष, प्रेरणादायी घोषणा आणि उत्साहपूर्ण वातावरणात दौड काढली जाते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपरेचे जतन व्हावे, समाजामध्ये धार्मिक जागृती निर्माण व्हावी तसेच तरुणांमध्ये धर्माभिमान, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
विजयादशमीच्या दिवशी भव्य महादौड!
नवरात्रोत्सवाच्या सांगतेनिमित्त विजयादशमीच्या दिवशी भव्य श्री दुर्गामाता महादौडीचे आयोजन करण्यात येणार आहे. या महादौडीत मोठ्या संख्येने धारकरी आणि हिंदुत्वप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, लांजा यांच्या वतीने करण्यात येत आहे.
