लवेल : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवात घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लवेलयेथील विद्यार्थ्यांनी कला व सर्जनशीलतेच्या विविध प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचा नावलौकिक वाढविला.श्रावणी संकपाळ हिने भारतीय शास्त्रीय अपर्कशन नसलेल्या एकल गायन प्रकारात तृतीय पारितोषिक मिळविले. तृतीय वर्ष(कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) चा विद्यार्थी शिवम सुभाष कदम याने क्ले मॉडेलिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. तर एमसीएविभागातील अविष्कार राजेंद्र पेढांबकर याने इंग्रजी कथालेखन, गट ‘ब’ या प्रकारात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवून आपल्यासाहित्यिक कौशल्याची छाप पाडली.विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेतील कलागुणांना मिळणारे प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केले जाणारेप्रयत्न अधोरेखित झाले आहेत. अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक, साहित्यिक आणि सर्जनशील उपक्रमांमध्येही विद्यार्थी उत्तम कामगिरी करत असल्याचे या यशातून दिसून येते.या यशाबद्दल डॉ. ओंकार जरळी, प्राध्यापिका श्रद्धा गोपाळ, प्राध्यापक अमेय फणसे आणि प्राध्यापिका सायली घाडगे यांनीविद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच प्राचार्य आणि उपप्राचार्य यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट परिवाराने या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून, भविष्यातील
स्पर्धांमध्येही त्यांनी अशीच उज्ज्वल कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.