मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर मुंबईत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील विलेपार्ले पश्चिमेकडील जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींकडून गोळीबाराची घटना घडल्याचं वृत्त आहे.

मुंबईच्या पश्चिम परिमंडळ-2 चे पोलीस उप-आयुक्त (DCP) मोहित गर्द यांनी टायगर श्रॉफ याच्या गाडीवरील गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

डीसीपी मोहित गर्ग यांच्या माहितीनुसार, “टायगर श्रॉफ सुरक्षित आहेत. त्यांना गोळी लागलेली नाही किंवा कोणतीही दुखापत झालेली नाही.”

गोळीबाराच्या या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहितीही मोहित गर्ग यांनी दिली.

टायगर श्रॉफ जुहू येथे फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. त्याचवेळी हा गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. टायगर श्रॉफचा चालक आणि त्याला पाहण्यासाठी आलेला एक चाहता गोळी लागल्याने जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र टायगर श्रॉफला गोळी लागली नसून तो सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. टायग श्रॉफवर झालेल्या गोळीबाराची जबादारी लॉरेन्स बिश्रोई गँगकडून स्विकारण्यात आली आहे. एक फेसबुक पोस्ट करत लॉरेन्स बिश्रोई गँगकडून या गोळीबाराची जबाबदारी स्विकारण्यात आली आहे. मुंबई फिल्म इंड्रस्ट्रीमध्ये जो आमचं म्हणणं ऐकणार नाही, किंवा सलमान खानसोबत काम करेल आता पुढचा नंबर त्याचा असेल, अशी धमकी देखील या पोस्टमधून देण्यात आली आहे.