खेड : तालुक्यातील व खाडीपट्टयातील तुंबाड गावातील न्यु इंग्लिश स्कूल तुंबाड ता खेड जि. रत्नागिरी या माध्यमिक शाळेला बहिरवली गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते खालीद भाई चौगुले यांच्या सौजन्याने सेन्सरसह वॉटर कूलर व वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला. या सुविधेचे उद्घाटन खालीद भाई चौगुले यांचे ज्येष्ठ बंधू श्री. अब्दुल्ला भाई चौगुले यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या कार्यक्रमाला तुंबाड गावचे पोलीस पाटील श्री. हरिश्चंद्र कदम, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. रामचंद्र घडशी, माजी सरपंच श्री. बंडू कदम, माध्यमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अस्मिताताई शिंदे, प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अश्विनीताई शिंदे, शिंदेवाडीच्या कार्यकर्त्या श्रीमती रंजनाताई शिंदे, तंटामुक्त समितीच्या उपाध्यक्षा सौ. रेश्माताई शिंदे तसेच सौ. सुनीता शिंदे, मुख्याध्यापक खेडेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत शाळेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते खालीदभाई चौगुले यांचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, शाळेच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद भेट ठरली आहे.