मंडणगड : लालबहादूर शास्त्री हायस्कूल, दहागाव मध्ये,दहागाव गावचे सुजाण नागरिक श्री. दिगंबर दळवी माजी सीनियर मॅनेजर सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयास दोन सिलिंग फॅन भेट स्वरूपात दिले आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसात वर्गात बसणाऱ्या विद्यार्थ्यांना उकाड्याचा त्रास होऊ नये आणि त्यांचे शिक्षण अधिक आनंददायी वातावरणात व्हावे, या उदात्त हेतूने श्री. दळवी यांनी ही मदत केली. त्यांच्या या दातृत्वाबद्दल विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक विजय खाडे त्यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.यावेळी लालबहादूर शास्त्री हायस्कूल माजी विद्यार्थी मंचाचे खजिनदार श्री. नंदकुमार दळवीह उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, “शाळा ही केवळ शिक्षकांची नाही, तर संपूर्ण गावाची असते. श्री. दळवी यांच्यासारखे दानशूर नागरिक शाळेच्या पाठीशी उभे राहतात, हीच आमची खरी ताकद आहे.” अशा भेटवस्तूंमुळे शाळा आणि समाज यांच्यातील नाते अधिक घट्ट होते. श्री. दळवी यांच्या या स्तुत्य कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुखद शिक्षणासाठी नागरिक दिगंबर विठोबा दळवी यांचा स्तुत्य उपक्रम…
