मंडणगड : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशानुसार युवासेनेचे तालुकाप्रमुख विकास पवार यांनी तालुक्यातील विविध पदांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या आहेत. त्यानुसार निगडी येथील ग्रामपंचायत सदस्य रुपेश निगूडकर यांची युवासेनेच्या तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रुपेश निगूडकर हे गेल्या तेरा वर्षांपासून युवासेनेत प्रामाणिकपणे काम करत आहेत. धडाडीचे आणि तालुक्यात सर्वांना परिचित असलेले रुपेश हे गरजवंतांच्या मदतीसाठी धावून जाणारे आक्रमक युवा सैनिक म्हणून ओळखले जातात. आपल्या कार्यातून त्यांनी ही ओळख निर्माण केली आहे.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला आक्रमक पदाधिकारी युवासेनेला मिळाल्याने युवासैनिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल तालुक्यातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
