चिपळूण : भाजपचे नगरसेवक संदीप भिसे यांच्या आरती संग्रहाचे प्रकाशन भाजपच्या जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य व वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या हस्ते चिपळूण येथील भाजपा रत्नागिरी दक्षिण संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात झाले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका शीतल रानडे, फार्मासिस्ट सेलचे जिल्हा संयोजक मधुकर निमकर, महिला मोर्चा शहर सरचिटणीस सपना भिसे, भाजपच्या कार्यकर्त्या प्राजक्ता टाकळे, सौ. तृप्ती यादव, संदीप पाटील, गणेश कदम . वेद सुर्वे. साहिल भिसे यश खंडझोडे. शौर्य भिसे. सिद्धेश भिसे. ओमकार सकटे. तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.