मंडणगड : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवाने उद्योगाची ओळख व्हावी, त्यांच्यात उद्योजकतेची आवड निर्माण व्हावी आणि भविष्यात स्वावलंबनाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा देव्हारे येथील विद्यार्थ्यांनी कळकवणे येथील मिलिंद ॲग्रो काजू युनिटला क्षेत्रभेट दिली. या भेटीदरम्यान युनिटचे मालक तथा उद्योजक मिलिंद पवार यांनी विद्यार्थ्यांना काजू प्रक्रिया उद्योगाची सविस्तर माहिती दिली. कच्च्या काजूपासून तयार उत्पादनापर्यंतच्या विविध प्रक्रिया, उद्योगाचे व्यवस्थापन, उत्पादनाचे नियोजन आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असणारे परिश्रम व कौशल्य यांची प्रत्यक्षीकासह माहिती करून दिली. ग्रामीण भागातही जिद्द, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर यशस्वी उद्योग उभारता येतो, याचा प्रेरणादायी अनुभव विद्यार्थ्यांना या क्षेत्रभेटीतून मिळाला. यावेळी केंद्रप्रमुख रजनी जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. सुरमेश घागरूम उपाध्यक्ष दिनेश बोबले उपमुख्याध्यापिका विद्या पवार, पदवीधर शिक्षिका मनीषा ठोंबरे, पदवीधर शिक्षक नितेश हुंबरे, मिलिंद ॲग्रो काजू युनिटचे मालक मिलिंद पवार, निकिता पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तुषार करावडे, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
देव्हारे केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांची मिलिंद ॲग्रो काजू युनिटला क्षेत्रभेट!…
