खेड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड लोकसभा संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम यांचे तालुकाप्रमुख सचिन निकम यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत भरणेनाका येथे जोरदार स्वागत केले. संजय कदम यांनी श्रीदेवी काळकाई मातेचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने संजय कदम यांना शाल पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर त्यांनी खेडमधील श्रीदेवी पाथरजाई मातेचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने रेशम पाटणे यांनी श्री. कदम यांना सन्मानित केले. त्यानंतर खेड शहर शिवसेना आयोजित नवरात्रौत्सवाच्या ठिकाणी स्थापन केलेल्या दुर्गादेवीचे त्यांनी दर्शन घेतले. जेष्ठ शिवसैनिक अरविंद तोडकरी, रमेश घटे, प्रशांत खातू, मुद्राळे यांनी संजय कदम यांना सन्मानित केले.
रायगड लोकसभा संपर्कप्रमुख संजय कदम यांनी तालुकाप्रमुख सचिन निकम व उपस्थित सर्व शिवसैनिकांशी संघटनात्मक संवाद साधला. सदैव आपल्या पाठीशी मी ठाम उभा आहे असा विश्वास देऊन ते मंडणगड, दापोली कडे रवाना झाले.
त्यांच्या या दौऱ्यात तालुकाप्रमुख सचिन निकम यांचेसह शहरप्रमुख चंद्रशेखर पाटणे, उपशहरप्रमुख राजन निर्मळ, जेष्ठ शिवसैनिक अरविंद तोडकरी, विभागप्रमुख संजय कदम, विभागप्रमुख लक्ष्मण घाग, उपविभागप्रमुख नारायण खेडेकर, उपविभागप्रमुख योगेश पवार, उपविभागप्रमुख गंगाराम दळवी, उपविभागप्रमुख लक्ष्मण भुवड, अंकुश कदम, किरण मोरे, प्रशांत खातू, संजय चव्हाण, रमेश घटे, रमेश शिंदे, मुद्राळे, अनंत पवार, सुभाष हंबीर, महेंद्र कडव, मनोहर शिगवण, आराध्य निकम आदी शिवसैनिक, कार्यकर्ते सहभागी होते.