खेड : तालुक्यातील जागृत देवस्थान भैरवनाथ मंदिर गाव चिंचघर याठिकाणी खेड दापोली मंडणगडचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या संकल्पनेतून व भैरवनाथ देवस्थान कमिटी व ग्रामस्थ मंडळी चिंचघर यांच्या सहकार्यातून तसेच पंचायत समिती खेड कृषी विभाग यांच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन व पशुसंवर्धन मेळावा अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
खेड तालुका नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गावदेवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने साजरा होणारा हा पहिलाच असा कार्यक्रम असल्याचे अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून मत व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या पशुधन त्यामध्ये गाई म्हैस अशा प्रकारची जनावरे पाहण्याचा व त्यांची निगा राखण्यासंदर्भातली सर्व माहिती तज्ञ मंडळीकडून देण्यात आली तसेच कृषी अंतर्गत लागणारे अवजारे बी – बियाणे, झाडांसाठी लागणारे औषधे जनावरांसाठी लागणारे औषधे याचे मोफत वाटप या निमित्ताने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी खेड पंचायत समिती सभापती डॉ. अफिया पालेकर, उपसभापती सुनील मोरे, पंचायत समिती सदस्य संग्राम कदम , श्रीमती तांबट, श्रीमती म्हादे तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय करपे साहेब उपस्थित होते. यामध्ये सर्वांनी या प्रदर्शनाचे खूप मनापासून कौतुक केले . ग्रामपंचायतचे सर्व माजी सरपंच, सदस्य तसेच देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री. कडू, पशुसंवर्धनचे अधिकारी श्री. पवार, प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुसचे डॉ. राठोड, कृषी सहायक श्री. धांडे , ग्रामपंचायत प्रशासक पंचायत समिती कृषी अधिकारी श्री. गावडे , कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे प्राध्यापक संतोष दरवडेकर,केंद्रप्रमुख प्रभाकर कोळेकर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, पत्रकार सुरेश पवार, तानाजी सावंत, ग्रामसेवक किशोर क्षिरसागर, तलाठी तसेच चिंचघर पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी, सर्व प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ तसेच शाळेतील विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक आवर्जून उपस्थित होते
मेळावा आयोजन करण्यासाठी चिंचघर गावातील ग्रामस्थांनी तसेच देवस्थान कमिटीच्या सर्व सदस्यांनी विशेष मनापासून प्रयत्न केले. सूत्रसंचालन चिंचघर शाळेचे शिक्षक अनिल मोरे तर आभारप्रदर्शन ग्रामसेवक किशोर क्षिरसागर यांनी मानले.