सावर्डे : खरेदी केलेल्या जागेच्या सातबारावर नाव समाविष्ट करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सावर्डे येथील एका मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने काही दिवसांपूर्वी जागा खरेदी केली होती. त्या जागेच्या सातबारावर स्वतःचे नाव नोंद करण्यासाठी त्यांनी संबंधित मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. मात्र नाव नोंदणीचे काम करून देण्यासाठी अधिकाऱ्याने पाच रुपयांची लाच मागितली. अशी माहिती सूत्रांनी दिली.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. ACB ने सापळा रचून आज अधिकाऱ्याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

या घटनेनंतर सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ACB अशा कारवाया यापुढेही करत राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.