चिपळूण : दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या चिपळूण सेवाकेंद्रातर्फे अधिक मासानिमित्त आणि कमला एकादशीच्या पर्वापर सर्व सेवेकर्यांनी सामूहिक पद्धतीने श्रींच्या चरणी ७०० श्लोकी भागवत पारायणाची सामूहिक सेवा समर्पित केली. तसेच विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण करण्यात आले.

चिपळूणच्या वीरेश्वर मंदिरात दर गुरुवारी चिपळूण सेवाकेंद्रतर्फे साप्ताहिक आरती आणि अध्यात्मिक सेवा होत असतात. गुरुवार दि.११ जून रोजी ७३ सेवेकऱ्यांनी भागवत पारायण आणि ८६ सेवेकऱ्यांनी विष्णुसहस्रनाम पठणाची सेवा समर्पित केली. ज्येष्ठ सेवेकरी सौ. मीनल काणेकर आणि श्री माधव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाकेंद्रात विविध उपक्रम राबवले जातात.
