खेड : शहरातील गुजरआळी येथील दशानेमा मुरली मनोहर मंडळाच्या जिर्णोध्दार सोहळ्यास शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली असून आज शनिवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार आहे, त्यानंतर सकाळी ८.३० ते १० या वेळेत हिंदोळा कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी १०:३० वाजता गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
सकाळी ११ ते १२ या वेळेत भगवंताला छप्पन भोगांचे अर्पण हा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व विशेष सन्मान आयोजित करण्यात आले आहेत. रविवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्रीसत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ ते २:३० भाविकांसाठी महाप्रसाद, रात्री ७.३० ते ९ – रात्रीचे भोजन, रात्री ९ पासून विशेष सांस्कृतिक कार्यक्रम व विशेष सन्मान – , सोमवार दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ५ ते ६:३० -काकडा आरती प्रारंभ. तरी या सोहळ्याच्या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन दशानेमा मुरली मनोहर मंडळ व महिला मंडळ खेड यांनी केले आहे.