खेड : कर्तव्य बजावत असताना प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना खेड-पन्हाळजे मार्गावरील एसटी बसमध्ये घडली. बसमध्ये सापडलेले १२ हजार रुपये रोख रक्कम असलेले पाकीट वाहक राहुल बोरेकर यांनी संबंधित व्यक्तीला परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खेड-पन्हाळजे मार्गावर ड्युटी करत असताना एसटी वाहक राहुल बोरेकर यांना बसमध्ये एक पाकीट आढळून आले. त्या पाकिटात १२ हजार रुपये रोख रक्कम होती. मात्र, पैशांचे आमिष न बाळगता त्यांनी प्रामाणिकपणाला प्राधान्य दिले आणि पाकीट त्याच्या मूळ मालकाला परत केले. आजच्या काळात पैशांपेक्षा प्रामाणिकपणा आणि माणुसकीला महत्त्व देणाऱ्या राहुल बोरेकर यांच्या कृतीचे विशेष कौतुक केले जात आहे. त्यांच्या या कृतीतून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमधील कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले आहे.
राहुल बोरेकर यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या या कृतीने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
एसटी वाहक राहुल बोरेकर यांचा प्रामाणिकपणा…१२ हजारांचे पाकीट केले परत…!
