खेड: कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, लांजाच्या खेड शाखेचा पहिला वर्धापन दिन 05 ऑक्टोबर 2026 रोजी खेड शाखा कार्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या खेड शाखेतील ज्येष्ठ सभासदांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता १० वी, १२ वी व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सभासद पाल्यांचा गौरवपत्र, भारतीय संविधान पुस्तक, भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तु.बा.कदम सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री. विजयकुमार चोपडे सर यांनी उपस्थित सभासदांना संस्थेच्या वाढीसाठी सभासदांचे योगदान तसेच सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत परवडी यांनी संस्थेच्या विविध ठेव योजना, कर्ज योजना तसेच सभासद वाढीसाठी खेड शाखेच्या कर्मचाऱ्यांनी व स्थानिक कमिटी सदस्य यांनी प्रयत्न करून खेड शाखेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.विलास दरडे, संचालक श्री. आंबेकर सर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संदीप डाफळे, स्थानिक कमिटी सदस्य श्री.कृष्णा आग्रे गुरुजी, श्री.मनोहर गोमले , श्री. सूरज जोगळे, शाखाधिकारी श्री.रूपेश गोठणकर, वसुली अधिकारी श्री.संदेश दिवाळे, दापोली शाखेचे शाखाधिकारी श्री. संभाजी डांगे, स्थानिक कमिटी सदस्य श्री. काशिनाथ पोसकर ,लिपिक श्री. विश्वदीप बहुतुले, पिग्मी व रिकरिंग प्रतिनिधी श्री.शुभम अलीम,सौ.अनन्या दरडी, पत्रकार श्री. बाळु सनगरे तसेच संस्थेचे सभासद, श्री. प्रभाकर सनगरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. दिपक शिगवण,श्री. विश्वास ( भाऊ ) शिगवण, श्री.गंगाराम इप्ते,श्री.प्रकाश जाधव सौ.नंदिता पाष्टे मॅडम,सौ.निलांबरी परवडी मॅडम,सौ. वृषाली दरडे मॅडम,सौ. स्नेहल आंबेकर मॅडम, तसेच मोठ्या संख्येने खेड शाखेतील सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष श्री. विलास दरडे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.प्रभाकर सनगरे सर यांनी केले व आभार प्रदर्शन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप डाफळे यांनी केले.
कुणबी विकास सहकारी पतसंस्था, लांजाच्या खेड शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा…
