चिपळूण :तालुक्यातील ओमळी गट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पत्रकार सुभाष कदम, तर व्हा. चेअरमनपदी माजी उपसभापती सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ओमळी सोसायटीच्या कार्यालयात बुधवार,दि.१९ ऑगस्ट २०२६ रोजी सहाय्यक सहकारी संस्था निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी व्हरकट यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हा. चेअरमनपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली.दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने सुभाष कदम व सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
सोसायटीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया जुलै महिन्यात सुरू झाली होती. यामध्ये सर्वसाधारण, महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच इतर प्रवर्गातून एकूण १३ संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर चेअरमन व व्हा.चेअरमनपदाची निवडणूकही बिनविरोध झाल्याने सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला.यावेळी संचालक संतोष चव्हाण,चंद्रकांत भि.जाधव, राजाराम गायकर, सतीश कदम, नितीन सोमण,अशोक जाधव, चंद्रकांत सि.जाधव,श्रीराम रसाळ, सुभाष बांद्रे,अश्विनी साळुंखे,प्रमिला बांद्रे आदी उपस्थित होते.निवडीनंतर उपस्थित संचालक,पदाधिकारी व ग्रामस्थांनी नवनिर्वाचित चेअरमन सुभाष कदम व व्हा. चेअरमन सुभाष जाधव यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.फोटो ओळ:ओमळी सोसायटीच्या चेअरमनपदी सुभाष कदम, तर व्हा.चेअरमनपदी सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर उपस्थित संचालक व पदाधिकारी.
