रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल होण्याची दाट शक्यता असून, याबाबत पक्षांतर्गत जोरदार चर्चा सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या सध्याच्या ९ मंत्र्यांपैकी ५ मंत्र्यांचे खाते बदलण्याच्या किंवा नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अध्यक्षा मा. सुनेत्राताई अजितदादा पवार या माजी मंत्र्यांना पुन्हा संधी देणार की नव्या दमाच्या चेहऱ्यांना पुढे आणणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या फेरबदलाच्या चर्चेदरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमुखी मागणी पुढे येत आहे की, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, अभ्यासू आणि जनतेशी थेट संपर्क असलेले आमदार सन्माननीय श्री. शेखरजी निकम साहेब यांना मंत्रिमंडळात मानाचे आणि कॅबिनेट दर्जाचे स्थान द्यावे.

मा. शेखर निकम साहेबांनी कोकणच्या आणि विशेषतः चिपळूण-संगमेश्वरच्या विकासासाठी सातत्याने भरीव काम केले आहे. त्यांचा अनुभव, संघटन कौशल्य आणि जनाधार लक्षात घेता त्यांना मंत्रिपद मिळाल्यास कोकणच्या विकासाला नक्कीच गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

तरी पक्षश्रेष्ठींनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, ही नम्र विनंती.