चिपळूण : कुमार गट राज्य अजिंक्य व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२६ नुकतीच पालघर – विरार येथे पार पडली. या स्पर्धेतून संघर्ष क्रीडा मंडळाचा खेळाडू कु. शैलेश येडगे यांची कुमार गट महाराष्ट्र कबड्डी संघात ‘५२ व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी’ निवड करण्यात आली असून, ही स्पर्धा १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर २०२६ रोजी पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पाटणा, बिहार. येथे बिहार स्टेट कबड्डी असोसिएशन. यांचे वतीने घेण्यात येणार आहे. कु. येडगे याचे निवडीबद्दल नुकताच संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण चे वतीने मुरलीधर मंदिर, वैश्यवसाहत, चिपळूण येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
त्याप्रसगी संस्थेचे जेष्ट्र खेळाडू व माजी अध्यक्ष श्री. नयन साडविलकर, मंडळाचे उपाध्यक्ष श्री. रविंद्र लवेकर, श्री. विकास उर्फ भाऊ पवार, श्री. संतोष भोसले व ३८ वर्षापूर्वी कुमार गट राष्ट्रीय स्पर्धेतून आपली कबड्डी कारकीर्द सुरू करणारे श्री. महादेव उर्फ बाळा कदम यांनी निवडीबद्दल मार्गदर्शन व सुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी कु. येडगेचे कबड्डी मार्गदर्शक श्री. ऋषिकेश भोजने, श्री. जितेंद्र कदम, श्री. अभिजीत सकपाळ तसेच मंडळाचे पदाधिकारी प्रमोद पवार, विनोद पवार, मधुकर पवार, प्रदीप पवार, रवींद्र पवार, सनी जाधव , लियाकत खडस, प्रदीप रामाणे हे माजी खेळाडू व सध्या खेळत असलेले खेळाडू मोठ्या संखेने उपस्थित होते. मंडळाचे वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन कदम , संस्थापक अध्यक्ष श्री विश्वास उर्फ भाऊ काटदरे यांनीही त्यांस सुभेच्छा दिल्या असून, स्पर्धेतून आपल्या खेळाचा ठसा कु. येडगे निश्चितच उमटवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. संघर्ष क्रीडा मंडळाचे वतीने दि. २७ डिसेंबर २०२६ रोजी ३ री राष्ट्रीय “चिपळूण हाफ मॅरेथॉन” स्पर्धा होणार आहे. यास्पर्धेमध्ये देशभरातील हजारो स्पर्धक सहभाग होत असून, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. सचिन कदम यांचे नेतृत्वाखाली चिपळूण मधील असंख्य मॅरेथॉन प्रेमी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत. त्याच प्रमाणे नोव्हेंबर २०२६ मध्ये संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. रविंद्र लवेकर यांचे पुढाकाराने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोशिएशनचे मान्यतेने “रत्नागिरी जिल्हा पुरुष व महिला खुला गट जिल्हा अजिंक्य व निवड चाचणी स्पर्धाही घेतली जाणार आहे.
