खेड : शहराजवळील भरणे येथील श्रीदेवी काळकाई मातेच्या नवरात्रोत्सवास आज रविवार दि ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. नवरात्रोत्सवाची सांगता होईपर्यंत सकाळी ५ वाजता काकड आरती, महाआरती, सायंकाळी ६:३० वाजता व सायं‌काळी ७ ते ७:३० या वेळेत दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहेत.
आज रविवार दि.११ ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता घटस्थापना, सायंकाळी ४ वाजता शासकीय सलामी आणि रात्री गावातील जाखडी नृत्य, सोमवार दि. १२ ऑक्टोबर रोजी कै. गणपन पांडुरंग घोले यांच्या स्मरणार्थ घोले परिवार यांजकडून देवाची आळंदी येथील ह.भ.प. भागवत महाराज भारती यांची किर्तन सेवा आणि रात्री १० नंतर दांडिया, मंगळवार दि.१३ ऑक्टोबर रोजी रात्री सवेणी खेड येथील शाहिर शक्तीवाले राजेश निकम व तिसे खेड येथील शाहिर तुरेवाले योगेश मुकनाक यांच्यात डबलबारी नाचाचा जंगी सामना, बुधवार दि. १४ ऑक्टोबर रोजी येणारे जाखडी नृत्य /दांडिया, गुरुवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सुदेश (भाऊशेठ) पाटणे यांच्या सौजन्याने ह.भ.प. येसरे महाराज यांची किर्तन सेवा आणि रात्री १० नंतर दांडिया, शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी बिरवाडी येथील ज्येष्ठ नागरीकांच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज नाच मंडळाचा नाच व येणारे भजन मंडळ, शनिवार दि.१७ऑक्टोबर रोजी चिंचवली खेड येथील शक्तीवाले वैदेही शेलार व चिपळूण येथील शाहिर तुरेवाले विशाल निकम यांच्यात डबलबारी नाचाचा जंगी सामना, रविवार दि. १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते १०- येणारे भजन मंडळ व रात्री १० नंतर गावातील महिलांचा मंगळागौर कार्यक्रम, सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी चिंचवली खेड येथील शाहिर शक्तीवाले साक्षी गोवळकर व पालवण चिपळूण येथील शाहिर तुरेवाले रुशांत भुवड यांच्यात डबलबारी नाचाचा जंगी सामना, सोमवार दि. २० ऑक्टोबर रोजी दसरा – दांडिया आणि शनिवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी श्रीसत्यनारायण महापूजेनिमित्त आयनी भोईवाडी खेड येथील निर्माता शाहिर रत्नाकर महाकाळ यांच्या श्रीभैरी जोगेश्वरी केदारनाथ भजनी नमन मंडळाच्या फिरले फासे नशिबाचे या वगनाट्याने आणि गण आणि नटखट गौळणीने नवरात्रोत्सवाची दिमाखदारपणे सांगता होणार आहे.