मंडणगड : मंडणगड शहराच्या बहु प्रतीक्षित नळपाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीचे सर्व श्रेय नगरपंचायतीतील सत्ताधारी या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याचा दावा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांनी 6 नोव्हेंबर 2026 रोजी नगरपंचायत सभागृहात आयोजीत पत्रकार परिषदेत केला. या योजनेला मंजुरी मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे आवश्यक असलेला प्रशासकीय व शासकीय स्तरावरील पाठपुरावा खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नळपाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर होणे आवश्यक होते त्यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावाकरीत आलेल्या अडचणींवर मार्ग काढण्यात आला योजनेस आवश्यक जमीनीसाठी आरोग्य व ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे स्थानीक व वरिष्ठ पातळीवर नेतृत्व तसेच राज्याचे आरोग्य मंत्री यांनी योग्य ती मदत केल्याने त्यांचे आभार मानत यावेळी कागदोपत्री परव्याचे आधारे आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात याची तपशीलवार माहीती स्पष्ट केली. विरोधकांनी न केलेल्या कामाचेही श्रेय घेण्याचा प्रकार गैर असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. सत्ताधारी या नात्याने महाआघाडी म्हणुन सर्व समन्वयाने तीनही पक्षांचा एकत्रीत कार्यक्रम घेण्याची सामोपचाराची भुमीका आम्ही घेतली होती पण विरोधक न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगताना विरोधकांनी काम मंजुर केले असल्याचे पाठपुराव्याचे कागदपत्रांचे आधारे ते स्पष्ट करावे असे यावेळी सांगीतले. खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नामुळे केंद्रशासनाच्या अमृत 2 या योजनेतून मंजुर झालेली 42 कोटी रुपयांची नळपाणी योजना 1कोटी निधीचे नमो उद्यान व बसस्थानकातील आवारातील 60 लाखांचे स्वच्छतागृह या तीन कामांचे 12 नोव्हेंबर 2026 रोजी भुमीपुजन संपन्न होणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस उपस्थित तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना न केलेल्या कामांचे फुकटचे श्रेय घेण्याची सवय नसल्याचे सांगीतले शहराचा दीर्घकाळ रखडलेले पाणी प्रश्न सुटवा हा आमच्या पार्टीचा अंजेड्यावरील अग्रक्रमचा मुद्दा असल्याचे व मतदारांने पाणी प्रश्न सोडवण्याचे दिलेले आश्वासन दुसऱ्या टर्म मध्ये सोडवीले जाणार असल्याचे यावेळी सांगीतले. पत्रकार परिषदेस नगराध्यक्षा अँड, सोनल बेर्ड माजी सभापती भाई पोस्टुरे मुश्ताक मिरकर माजी जि.प. सदस्य प्रकाश शिगवण जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी नगसेवीका सौ. प्रियांका लेंडे सौ. मनिशा हातमकर सुधिर हातमकर, दीनेश सापटे, हरेश मर्चंडे शहर अध्यक्ष साईराज सावंत, मंगेश लाखण उपस्थित होते.