मंडणगड : लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव मध्ये आज 77 वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रशालेतील विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर बी. एन.वैद्य ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश खाडे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यास कुमारी सिया एरवनकर हिने अनुमोदन दिले. यानंतर सुरेश खाडे, सौ.विनया नाटेकर, किशोर कासारे, रंजन दळवी, अशोक दळवी, ग्रंथपाल सौ.पूजा दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून,संविधान प्रतिला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.
यानंतर प्रशालेतील शिक्षक किशोर कासारे यांनी संविधान निर्मिती, आवश्यकता व त्याचा प्रभाव, आवश्यकता याविषयी माहिती दिली.
त्यानंतर प्रमुख उपस्थित माजी केंद्रप्रमुख श्री. रंजन दळवी यांनीही मार्गदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष व बी एन वैद्य ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. सुरेश खाडे यांनीही विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.विनया नाटेकर, सौ. मानसी पालांडे,श्री.विक्रम शेले, श्री. जितेंद्र कलमकर, श्री. किशोर कासारे, श्रीमती वैशाली पुदाले,बी. एन. वैद्य ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश खाडे, ग्रंथपाल सौ. पूजा दळवी, माजी केंद्रप्रमुख श्री. रंजन दळवी, सामाजिक कार्यकर्ते अशोक दळवी त्याचबरोबर भाई गुडेकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी स्मरणिका गायकवाड व सिया येरवणकर यांनी केले.
लालबहादूर शास्त्री हायस्कूल व अभियान वैद्य ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने दहागाव येथे संविधान दिन साजरा…
