म्हसळा (महेश पवार) : म्हसळा तालुक्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था सध्या पूर्णपणे ढासळल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. रुग्णालय सुरू होऊन तब्बल १२ वर्षांचा कालावधी उलटूनही शासन व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून आरोग्य व्यवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना तालुक्यांतील नागरिकांत व्यक्त होत आहे.

या ग्रामीण रुग्णालयात दररोज सरासरी किमान ११० रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र रुग्णालय स्थापनेपासून आजतागायत वैद्यकीय अधीक्षक (वर्ग-१) हे महत्त्वाचे पद रिक्तच आहे. याशिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त असून सध्या केवळ एकच कायम स्वरूपातील वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहे. उर्वरित जागा रोहा येथून प्रति नियुक्तीवर डॉक्टर पाठवून भरल्या जात असल्याची माहिती मिळते.रुग्णालयाचे उद्घाटन २५ मे २०१४ रोजी झाले.

सध्या रुग्णालयात केवळ तीन कंत्राटी डॉक्टर कार्यरत होते. त्यापैकी दोन डॉक्टर पुढील शिक्षणासाठी नोकरी सोडून गेल्याने आरोग्य सेवेवर अधिक ताण निर्माण झाला आहे.

पर्यटन वाढल्याने अपघात व जखमींच्या संख्येत वाढ होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. मात्र गंभीर रुग्णांना वारंवार इतर रुग्णालयांत रेफर करावे लागत असल्याने नातेवाईकांत नाराजी वाढत आहे. प्रसूती सेवा सातत्याने उपलब्ध नसल्याच्याही तक्रारी आहेत.अनेक वेळा रुग्णांसोबत आलेले नातेवाईक “कायम डॉक्टर का नाहीत?” असा सवाल उपस्थित करत वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी वाद घालत असल्याचे प्रकारही घडत आहेत.

नागरिकांची मागणी

वर्षभरातील रुग्णसेवेचा आढावा (२०२५)

कायमस्वरूपी अधीक्षक व अनुभवी डॉक्टर नसतानाही रुग्णालयाने मोठ्या प्रमाणावर सेवा दिली आहे :

  • ओपीडी रुग्ण – ३२,७६१
  • आयपीडी रुग्ण – २,२३७
  • एम.एल.सी. प्रकरणे – ६१२
  • सर्पदंश – ६७
  • कुत्रादंश – ५५०
  • विंचूदंश – १५१
  • रेफर रुग्ण – ४४८
  • शवविच्छेदन – १४
  • उपचारादरम्यान मृत्यू – ४
  • अपघात जखमी – ३४४ १२ वर्षांच्या कालावधीतही पुढील महत्त्वाची पदे भरली गेली नाहीत :
  • वैद्यकीय अधीक्षक (वर्ग-१) – १
  • दंतचिकित्सक (वर्ग-२) – १
  • कनिष्ठ लिपीक (वर्ग-३) – १
  • क्ष-किरण तंत्रज्ञ – १
  • सहाय्यक अधीक्षक – १