सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावचे उद्यमशील शेतकरी व समाजसेवक अच्युत प्रभूतेंडोलकर यांनी जायफळ या मसाला पिकावर संशोधन करत “समर्थ १” आणि “समर्थ २” या दोन नव्या प्रजाती विकसित केल्या आहेत.

या प्रजातींना भारत सरकारच्या वनस्पती जाती नोंदणी प्राधिकरण (Plant Variety Registration) विभागाकडून अधिकृत मान्यता मिळाली असून संबंधित कायदेशीर हक्क (पेटंट) अच्युत प्रभूतेंडोलकर यांना प्रदान करण्यात आले आहेत.

अच्युत प्रभूतेंडोलकर यांनी विकसित केलेल्या या प्रजाती कोकणातील हवामान व मातीशी सुसंगत असून अधिक उत्पादन देणाऱ्या आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जायफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल तसेच उत्पादनक्षमता आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH