सुधागड( धम्मशील सावंत ): काही महिन्यांपूर्वी रायगड च्या सुधागड तालुक्यातील हातोंड ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या जबरी दरोड्याच्या गुन्ह्यात पाली -रायगड पोलिसांनी जाबाज कामगिरी करीत महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. पाली पोलीस ठाणे यांनी जप्त केलेला मुद्देमाल मा. न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादींना परत केला आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे. या दरोड्याने हातोंड गोंदावं सह सुधागडात मोठी दहशत निर्माण केली होती, दरोदेखोर आरोपिंच्या मुसक्या लवकरात लवकर आवळून त्यांना धडा शिकवावी अशी मागणी होत होती, अखेर पाली पोलिसांना या कामी यश आले आहे.
गुन्हा क्र. I CR NO. 79/2025
BNS कलम 310(2), 311, 309(4), 127(2), 111 सह आर्म अॅक्ट 4, 25 अन्वये दाखल गुन्ह्यात आरोपींच्या ताब्यातून ₹३७,००० किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. सदर गुन्ह्यातील फिर्यादी श्री. संभाजी दामा वाघमारे (रा. हातोंड, ता. सुधागड) यांना हा मुद्देमाल परत करण्यात आला.
गुन्हा क्र. I CR NO. 03/2025
BNS कलम 118(4), 318(2), 3, 5 अन्वये दाखल गुन्ह्यात ₹२,५०,००० किंमतीची सोन्याची चैन जप्त करण्यात आली होती. या प्रकरणातील फिर्यादी श्री. अनंत दत्तात्रेय जाधव (रा. धोंडसे, ता. सुधागड) यांना मा. न्यायालयाच्या आदेशानुसार सोन्याची चैन परत देण्यात आली.
या जबरी दरोड्याचा पर्दाफाश करण्यात आला असून ; ₹२.८७ लाखांचा मुद्देमाल पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर व टीममार्फत फिर्यादीना परत करण्यात आला. दोन्ही प्रकरणांतील मुद्देमाल दोन पंचांसमक्ष ई-साक्ष प्रक्रियेद्वारे एकूण ₹२,८७,००० किंमतीचा फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी हातोंड ग्रामपंचायत हद्दीत घडलेल्या जबरी दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या वेगवान तपासामुळे आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात यश आले. या कारवाईमुळे पाली परिसरात कायद्याचा धाक पुन्हा अधोरेखित झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे स्वागत केले आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
