रोहा ( अल्ताफ चोरडेकर ) : रोहा-अष्टमी नगर पालिकेने सन २०२६-२७ आर्थिक वर्षाचा १ कोटी १२ लाख त्रेनशि हजार नऊशे त्रेहत्तर (११२८३९७३ रुपये ) कोटींचा शिल्लकी वर्षिक अर्थ संकल्प सादर करण्यात आला.नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली रोहा नगर पालिकेच्या कै.द.ग.तटकरे सभागृहात गुरुवार दुपारी विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा कु.वनश्री समीर शेडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके व सभापती यांनी सदर अर्थ संकल्प संदर्भात माहिती सादर केली.
सद्या घरगुती नळ कनेशनसाठी १८०० रु. नळपट्टी आकारली जाते. मात्र चालू आर्थिक वर्षात घरगुती नळ कनेशक्शनसाठी पाणी पट्टीत १ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली असून पुढील वर्षापासून २८०० रु. पाणीपट्टी आकारली जाणार आहे. डोलवहाळ पाणी योजना सद्या तोट्यात असल्याने भविष्यात ना नफा ना तोटा या तत्वार सदर योजना राबविण्यासाठी पाणीपट्टी वाढीवचा कठोर निर्णय घावा लागला आहे. मात्र वाढ करण्यात आलेल्या पाणीपट्टीत भविष्यात 5 वर्षात कधीच करात वाढ होणार नाही ग्वाही नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेडगे यांनी दिली.विजेचा पंप लावून पाणी घेण्याचा गैरमार्ग अन्य ग्राहकांसाठी त्रासदायक असल्याने त्या त्या ग्राहकांना मुबलक पाणी मिळत नाही. भविष्यात बेकायदेशीर विजेचा पंपाचा वापर करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल. तत्पूर्वी नागरिकांनी नगर पालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी केले.
त्याचप्रमाणे आजच्या वार्षिक अर्थ संकल्पामुळे शहरातील सर्व मद्य विक्रेर्त्यांना दणका बसणार असून पुढील आर्थिक वर्षात बिअर शॉपीसाठी ५ हजार, बियर बार व परमिट रूमसाठी १ हजार, वाईन शॉप करिता १ हजार, देशी दारूचे दुकान १५०० रुपये तसेच ताडी माडी विक्री केंद्र ५०० रुपयांनी अधिक वाढ करण्याचा धडक निर्णय घेण्यात आला आहे.तसेच मोठे व्यवसाय करणाऱ्या व्यापऱ्यांना देखील नाहरकत दाखल्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. या पुढे भंगार व्यवसाईकांना देखील कर आकारणी होणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेडगे,मुख्याधिकारी अजयकुमार एडके, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, सभापती राजेंद्र जैन,महेंद्र दिवेकर,महेश कोलटकर,रवींद्र चाळके,सौ.निता हजारे, नगरसेवक प्रशांत कडू,अरबाज मणेर,रोशन चाफेकर,दिवेश जैन,सौ.गौरी बारटक्के,स्नेह अंब्रे,सौ.संजना शिंदे,डॉ.अश्विनी धनावडे व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
