खेड : सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने तसेच खेडमधील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर मरकड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे येथे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेला सिलिंग फॅन भेट देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचे शैक्षणिक वातावरण अधिक सुखकर व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विशेषतः वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळेला सिलिंग फॅन मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या कार्यक्रमाला पदवीधर शिक्षिका स्वाती राठोड, उपशिक्षक कासार सर व कासार मॅडम तसेच मुख्याध्यापक राजेंद्र बेलोसे सर उपस्थित होते. यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर आणि माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना शिक्षणात प्रगती करण्यासाठी प्रेरित केले.
उपस्थित मान्यवरांनी लायन्स क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते तसेच शाळांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले.
लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने सातत्याने सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविले जात असून, भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम सुरू ठेवण्याचा मानस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
