लांजा ( प्रतिनिधी ) : शहरातील वैभव वसाहत येथून विवाहीत महिला बेपत्ता झाल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली असून तिच्या मुलाने लांजा पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुफरान अशरफ पाटणकर (वय २२) हा नाईक मटण शॉप मध्ये कामाला असून याची आई हवाबी अशरफ पाटणकर (वय ४५, रा.वैभववसाहत, लांजा, ता.लांजा, जि.रत्नागिरी) ही गेले दिड महिन्यापासून पित्ताच्या पिशवीच्या आजराने आजारी होती. तिच्या आजारावर कोल्हापूर येथील अस्टर आधार येथे औषधोपचार सुरू होते.

दरम्यान, रविवार २२ फेब्रुवारी रोजी फिर्यादी गुफरान याचे वडील अशरफ मुसा पाटणकर (वय ५०) हे पालकर मटण शॉप मध्ये कामाला असून ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यांनतर ते दुपारी १२ वाजता घरी आले असता घराच्या बाहेरील दरवाजाला कडी लावलेली होती. ती कडी त्यांनी उघडून आत मध्ये गेले असता घरात कोणीही नव्हते. यावेळी पत्नी हवाबी हिचा मोबाईल त्यांना घरातच आढळून आला. म्हणून गुफरान यांच्या वडिलांनी आजूबाजूला तसेच सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली असता तिचा शोध लागला नाही. अखेरीस हवाबी पाटणकर हिचा मुलगा गुफरान याने २५ फेब्रुवारी रोजी लांजा पोलीस ठाणे येथे आई बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली.

बेपत्ता झालेली हवाबी पाटणकर हिचे वर्णन रंग निमगोरा, अंगाने मध्यम, उंची ४ फुट ३ इंच, केस काळे लांब, चेहरा गोल, कानात सोन्याचे गोल रिंग, गळ्यात एक मन्याचे मंगळसुत्र, डाव्या हातात गोल्डन रंगाचे घड्याळ, उजव्या हातात हिरव्या बांगड्या, उजव्या पायात काळा दोरा, डाव्या डोळ्याच्या भुवईवरील भागावर जुन्या जखमेचा व्रण, अंगात मेहंदी कलरचा पंजाबी ड्रेस, पायात काळया रंगाची सँडल असे आहे.

वरील वर्णनाची व्यक्ती कोठे आढळून आल्यास लांजा पोलीस ठाणेत संपर्क करावा असे आवाहन लांजा पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई विकास पवार हे करत आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH