लांजा: प्रतिवर्षाप्रमाणे लांजा शहरात छत्रपती शिवाजी चौक येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान लांजा संघटनेचे वतीने शिवजयंती जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
या वेळी सकाळी मुर्ती पुजन करण्यात आला,पाळणा, पोवाडे, महाप्रसाद, दुपारनंतर भांबेड येथील ह.भ.प.संतोष कुर्णेकर ग्रुप तर्फे बाळ कीर्तनकार ह.भ.प.श्रावणी यादव लांजा या मुलीचे कीर्तन झाले.त्या नंतर उपरी येथील हिंदू महासभेचे व्याख्याते श्री निळकंठ माने यांचे व्याख्यान झाले.त्यानंतर पालखी मिरवणूक ढोलपथकासह, महाआरती व दिपोत्सव असे विविध कार्यक्रम पार पाडले गेले.यामंडळाचे प्रमुख सचिन कदम,ओम कुंभार,सुशांत राहाटे, अनिकेत शेट्ये, रूपेश चव्हाण,विजय मोर्डेकर, महेंद्र रजपूत, सतीश पावसकर,उदय शिंदे तसेच हिंदू महासभेच्या पदाधिकारी तिलोत्तमा खानविलकर यांनी हीआपले मनोगत व्यक्त केले त्यांच्या सोबत दिपाली देसाई उपस्थित होत्या.वरीलकार्यकारी मंडळी यांनी अतिशय चांगल्याप्रकारे मेहनत घेतली.