चिपळूण : चिपळूण नगर परिषदेने प्लास्टिक बंदी विरोधात मोहीम राबवत १७ किलो प्लास्टिक जप्त केले. या कारवाईत २१ हजार रुपयांचा वसूल करण्यात आला आहे. या कारवाईने प्लास्टिक पिशवीत साहित्य विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

एकल वापर प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्राण मंडळाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमे अंर्तगत चिपळूण नगर परिषद हद्दीमध्ये प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने तपासणी मोहिम नुकतीच गोवळकोट रोड परिसरामध्ये राबविण्यात आली.

या मोहिमेमध्ये गोवळकोट रोड परिसरातील हॉटेल व्यावसायिक, बेकरी व्यावसायिक, मटण व मच्छी विक्री व्यावसायिक व भाजी व फळे विक्री व्यावसायिक यांच्या आस्थापनामध्ये एकल वापर प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई मध्ये आस्थापनांना प्रत्यक्ष स्थळ भेट देवून त्यांच्याकडील एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले. यामध्ये १७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच २१,०००/-रुपये दंड वसूल करण्यात आला. सदर कारवाई ही चिपळूण नगर परिषद मुख्याधिकारी संजय जाधव उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आली. यामध्ये आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते आरोग्य निरीक्षक सुजित जाधव साहेब, आरोग्य निरीक्षक प्रविण जाधव साहेब, अतिक्रमण विभागाचे संदेश टोपरे, मुकादम दिपक किंजळकर कार्यालयीन कर्मचारी मनिष जाधव व स्वच्छता दूत सहभागी झाले होते.