पोलादपूर (प्रतिनिधी)- पवित्र कुरआन समजून घेतल्यास हा प्रेषित महंमद पैगंबरांनी मानवजातीस उध्दारक बाबींवर महत्वाची विधाने नमूद केली आहेत. मात्र, आपण आपल्यापुरता धर्मग्रंथ म्हणून बाळगल्याने अन्य धर्मियांमध्ये याबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. आपली मस्जिद तसेच धर्मविषयक मार्गदर्शन करणाऱ्या संस्था सर्वधर्मियांना अभ्यासासाठी तसेच जाणून घेण्यासाठी खुल्या ठेवल्यास बंधुभाव अधिक वाढेल, असे मत अकोला येथील इश्तियाक अहमद यांनी व्यक्त केले.

महाड तालुक्यातील राजेवाडीतील मशिदीत ‘शिवराय ते भिमराय समतामार्च’निमित्त समता इफ्तारीचे आयोजन करण्यात आले असता यानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, नागेश जाधव, संविधानाचे अभ्यासक नूर खाँ पठाण, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर, रायगडचा आवाज आणि कोकण की आवाज वृत्तपत्रांचे संपादक दिलदार पुरकर, मुफ्ती मोहसीन वाडेकर, हनिफ पुरकर, राजेवाडी मोहल्ला अध्यक्ष वहाब कापडी, इकबाल काझी, जहीर सावंत, मुराद चाफेकर, रफीक लंबाडे, फईम आलेकर, शैवाज धनसे, अब्दुल मजीद लोकरे, अब्दुलहक खलफे तसेच अनेक समाजबांधव उपस्थित होते.
याप्रसंगी शिवराय ते भिमराय समता मार्चचे प्रा.दीपक क्षीरसागर, नंदा म्हात्रे, अलका माटे, सुनंदा गायकवाड, लारा, दीक्षा, प्रज्वल, सुमीत, मनोज इवलेकर तसेच अन्य कार्यकर्ते, इम्रान कौचाली तसेच अनेक स्थानिक तरूण उपस्थित होते.