पोलादपूर: तालुक्यातील कापडे बुद्रुक गावचे ज्येष्ठ समाजसेवक व्ही डी पवार यांच्या पत्नी ललिता पवार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूसमयी त्या ७६ वर्षे वयाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात तुषार, अमोल, अभिजीत हे कर्तबगार पुत्र, ज्योती, वर्षा, रेश्मा या कन्या सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कापडे बुद्रुक सिद्धार्थ नगर येथील रहिवासी शोकसागरात बुडाले आहेत.
