सिंधुदुर्ग : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
आज झालेल्या दरवाढीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल ९० पैशांनी महाग झाले असून पेट्रोलचा दर प्रति लिटर ११० रुपये ४७ पैसे इतका झाला आहे. तर डिझेलच्या दरात ९५ पैशांची वाढ झाली असून डिझेलचा दर प्रति लिटर ९७ रुपये ०३ पैसे इतका झाला आहे.
विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या दहा दिवसांतील ही तिसरी मोठी दरवाढ असल्याने वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम महागाईवरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.