मुंबई : राज्यात सध्या स्वयंघोषित ज्योतिषी, भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशोक खरातमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला आहे. चाकणकर या अशोक खराबला गुरू मानत होत्या, त्यांचे अनेक फोटो सुद्धा या भोंदूसोबत असल्याने त्यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. या भोंदूसोबत अनेक नेतेमंडळींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राजकारणातील भोंदू भक्तांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राजकारणातील भोंदू भक्तांवरही कारवाई करा : उद्धव ठाकरे
